Site icon Aapli Baramati News

बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात रंगला कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.  

वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे, रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेली दीड वर्ष कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सन्मान करण्यात आला. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुभाष ढोले यांच्याकडून सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सेवकांचा “कोरोना योद्धा” म्हणून स्मुर्ती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुभाष ढोले यांनी केले. तर सूत्रसंचालन बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल इंगवले यांनी केले.  यावेळी टी.व्ही मोरे, ॲड.अविनाश गायकवाड,अविनाश लगड,वनिता बनकर,अनिता गायकवाड,आरती शेंडगे, शब्बीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णालयातील ज्येष्ठ अधिपरीचारिका जयश्री देवकाते व क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी हनुमंत शिंदे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमांमध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचारी आदींसह १२५ कोरोना योद्धांचा सन्मान सत्कार करण्यात आला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version