Site icon Aapli Baramati News

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात ‘आयओटी’ विषयावरील कार्यशाळा संपन्न

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील बीबीए कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विभागाच्या व थॉटपॅड इन्फोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयओटी’ या विषयावर चार दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यशाळेचे उद्घाटन थॉटपॅड इन्फोटेकचे संचालक शिरीष कादबाने व शुभम वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. या चार दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ब्लींकिंग एलईडी, सोमीटर एप्लीकेशन ऑन डेली लाईफ, मोटर टेंपरेचर सेन्सर आदी विषयांबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

प्रा. महेश पवार यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे  मार्गदर्शन यानिमित्ताने उपलब्ध करून देता येत असल्याचे यावेळी नमूद केले. अमर मुलाणी, सुरज सोमाणी, प्रतिक्षा झोंड व शीतल पिसाळ यांनी आपले अनुभव कथित करत अशा प्रकारच्या कार्यशाळा भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले.  

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य शामराव घाडगे व समन्वयक नीलिमा पेंढारकर यांनी कोविड काळानंतर यशस्वीपणे आयोजित केलेल्या या कार्यशाळेबद्दल थॉटपॅड इन्फोटेक आणि विभाग प्रमुख महेश पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version