आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणपुणेबारामतीमहाराष्ट्रराजकारण

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

पवार पब्लिक  चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बारामतीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार,संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून १६ विद्यार्थ्यांना एकूण  ३ लाख १३ हजार २८६ रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

बारामती तालुका संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष धनवान वदक व  पदाधिकारी यांच्या हस्ते पात्र व गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या दृष्टीने धनादेश वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे बारामती लोकसभा मतदार संघातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात येत असते. त्यानुसार बारामती तालुक्यातील या वर्षी दुसऱ्या टप्प्यातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या एकूण १६ विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली.

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून झालेल्या आर्थिक मदतीमुळे पुढील शिक्षण घेण्यास मोठी मदत झाल्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विद्यार्थ्यांनी आभार मानून आनंद व्यक्त केला.     यावेळी तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनील बनसोडे,उपाध्यक्ष तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष बाळासाहेब आगवणे,डॉ. अनिल सोरटे, यशस्वीनी सामाजिक तालुका अभियान सह समन्वयिका दिपाली पवार,अक्षय चव्हाण आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us