Site icon Aapli Baramati News

निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच माळेगाव नगरपंचायतीची उमेदवारी : अजितदादांनी केली भूमिका स्पष्ट

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

माळेगाव नगरपंचायतीची आगामी निवडणूक ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर लढवली जाणार आहे. सतरा जागांवर उमेदवार देताना निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच संधी दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

माळेगाव येथील राजहंस संकुलाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना अजितदादांनी माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीबद्दल भूमिका स्पष्ट केली. ज्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे, ज्याची लोकांमध्ये प्रतिमा चांगली आहे अशाच लोकांना माळेगाव नगरपंचायतीमध्ये उमेदवारी दिली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीबद्दल बरीच चर्चा आहे. अनेकजण वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. मात्र ही निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवणार आहोत. त्यामुळे या निवडणूकीत योग्य उमेदवारांनाच संधी दिली जाईल, असे अजित पवार यांनी जाहिर केले.

निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे. आरक्षणानुसार ही निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अजित पवार यांनी माळेगाव निवडणुकीविषयी भूमिका स्पष्ट केल्यामुळे आता इच्छुकांची धाकधुक वाढली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version