Site icon Aapli Baramati News

दु:खद बातमी : बारामतीतील ज्येष्ठ व्यापारी, मोता परिवाराचे प्रमुख रमणिक मोता यांचे निधन

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विद्या प्रतिष्ठानचे माजी खजिनदार आणि बारामतीतील मोता परिवाराचे प्रमुख रमणिक रामजी मोता यांचे आज दुपारी निधन झाले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रमणिक मोता हे मागील काही दिवसांपासून प्रदीर्घ आजाराने त्रस्त होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

बारामतीतील कापड व्यवसायात मोता यांचे नाव अग्रेसर होते. त्याचबरोबर बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या स्थापनेपासून त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे माजी खजिनदार आणि बारामती सहकारी बॅंकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 

त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रमणिक मोता यांच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version