Site icon Aapli Baramati News

खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस बारामतीत उत्साहात; कार्यकर्त्यांनी दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे मोठ्या उत्साहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केक कापून सुप्रियाताईंना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.  

बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी सुप्रियाताईंच्या वाढदिवसानिमित्त  शुभेच्छा दिल्या. दूध संघाच्या संचालिका वैशाली संतोष साळुंके यांनी खास केक आणून हा वाढदिवस साजरा केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून होत असलेल्या कामाप्रति आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या.  

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती निता फरांदे,उपसभापती रोहित कोकरे, गटनेते सचिन सातव, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक, सोशल मिडिया सरचिटणीस प्रदिप जगदाळे, नितीन शेंडे, पंचायत समिती गटनेते प्रदीप धापटे,  महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वनिता बनकर, शहर अध्यक्षा अनिता गायकवाड, युवकाध्यक्ष राहुल वाबळे, विद्यार्थी अध्यक्ष तुषार कोकरे,  लीगल सेलचे अध्यक्ष रविंद्र माने, युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, शहर अध्यक्षा आरती शेंडगे, सोशल मीडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, छत्रपतीचे संचालक संतोष ढवाण, बाजार समिती सभापती अनिल खलाटे,  साधू बल्लाळ, बाळासाहेब आगवणे, संगिता पाटोळे, सुवर्णा तावरे, दिपाली पवार, पै.माने वस्ताद, रणजित धुमाळ, शब्बीर शेख, पैगंबर शेख, वैभव पवार, सौरभ राऊत, सूर्यकांत पिसाळ आदींसह बारामती तालुक्यातील व शहरातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version