Site icon Aapli Baramati News

अजितदादांच्या कामाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने घेतली दखल; सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्काराने गौरव

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन कड़ून उपमुख्यमंत्री  अजित  पवार यांनी महाराष्ट्रात कोरोनामुक्तीसाठी केलेल्या  कार्याची दखल घेण्यात आली आहे. अजितदादांनी धडाकेबाज निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन कडून  ” सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट”  पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्  चे यूरोप चे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्ती साठी जनजागृति केली जात आहें. तसेच करोना मुक्ती साठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सदर संस्था मार्फत  व्यक्ती व संस्थाना सम्मानित करण्यात येत आहें

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले धडाडीचे व झटपट निर्णय, वैदकीय सुविधा प्राप्त करून देण्यासाठी केलेले कार्य आदी कार्याची  कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार दिला गेला आहे. अजित पवार दर आठवड्याच्या शुक्रवारी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहरात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करतात आणि या बैठकीत सर्व शासकीय अधिकाऱ्यांकडून कोरोना संदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतात. तसेच रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाय योजना राबविण्याचा तातडीने निर्णय घेतात.

दर शनिवारी आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघात देखील अशाच पद्धतीच्या कोरोना आढावा बैठकीला ते उपस्थित राहतात. राज्यमंत्री मंडळातल्या बहुतांश पालकमंत्र्यांनी पैकी अशी दर आठवड्याला आढावा बैठक घेणारे अजित पवार हे एकमेव पालकमंत्री आहेत. त्यांच्या या कामाची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन चे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात उपमुख्यमंत्री दालनात सदर पुरस्काराने सन्मानित केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version