Site icon Aapli Baramati News

अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या व्यायामशाळेकडून खेळाडूंचा गौरव

ह्याचा प्रसार करा

शरद पवार, प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

बारामती : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या व्यायामशाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी केक कापून शरद पवार व प्रतिभा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे, नितीन शेंडे, सुभाष बर्गे, आयर्नमॅन सतीश ननवरे, श्रीकांत जाधव, प्रेम जाधव, बापू जाधव, दीपक कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या व्यायामशाळेच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना शरीरसौष्ठव कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.  

यावेळी व्यायामशाळेतील विविध खेळाडूंचा शरीरसौष्ठव स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरे याचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. बारामतीतील प्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू संतोष जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version