आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
कृषि जगत

उजनी धरणातून आजपासून ३२०० क्युसेकने पाणी सोडले जाणार

कृषि जगत
ह्याचा प्रसार करा

सोलापूर : प्रतिनिधी

आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी सोडले जाणार आहे. त्याच बरोबर हे आवर्तन महिनाभर सुरू राहणार आहे. टप्प्याटप्याने तब्बल तीन हजार दोनशे क्युसेकने उजनीतून पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.

सध्या उजनीमध्ये ९७. ७२ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून त्यापैकी ३४ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ११४ टीएमसी इतकी या धरणाची साठवण क्षमता आहे. तर सुमारे १४ टीएमसी इतका या धरणात गाळ असून लवकरच गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

दरवर्षी या धरणातून केवळ एकच आवर्तन सोडण्यात येते. परंतु यावर्षी पावसाळा लांबणीवर पडल्यामुळे दोन आवर्तने सोडण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या पार पडलेल्या बैठकीत दोन आवर्तनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी हे धरण वरदानच ठरले आहे.


ह्याचा प्रसार करा
कृषि जगत
Back to top button
Contact Us