Site icon Aapli Baramati News

‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेच्या ११ व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी अपडेट करणे गरजेचे असून ही प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना माहिती अपडेट करण्यासाठी आधार कार्ड आणि आधार कार्डसाठी मोबाईल नंबर गरजेचा असणारं आहे. यासाठी केवळ या दोनच गोष्टी गरजेच्या आहेत. केवायसी अपडेट करण्यासाठी सुरूवात झाली होती. परंतु त्यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना झाला होता. या तांत्रिक अडचणीत सुधार करून पुन्हा एकदा अपडेट करता येणार आहे.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. परंतु आता या योजनेचे स्वरूप बदलले आहे. जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. या योजनेची सुरुवात होऊन तीन वर्ष झाली असून आतापर्यंत दहा हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. ११ व्या हप्त्याचे पैसे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version