Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : आंबा, काजू, संत्रा यासह ज्वारीचा पीकविमा ४ आणि ५ डिसेंबर या दिवशी भरता येणार; धनंजय मुंडे यांची विनंती केंद्राकडून मान्य

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा येत्या चार व पाच डिसेंम्बर या दोन दिवसात भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपली आहे. मात्र कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीनंतर केंद्राकडून ४ व ५ डिसेंबर या दोन दिवसांसाठी पीक विमा पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी, तसेच आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा एक रुपयात पीकविमा भरण्यासाठी केंद्राकडून ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी किमान दोन दिवस वरील पिकांचा विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात यावे, अशी विनंती केंद्राकडे केली होती. ही विनंती केंद्राकडून मान्य करण्यात आली आहे.

दरम्यान जे ज्वारी, आंबा, काजू, संत्रा आदी उत्पादक शेतकरी विहित वेळेत आपला विमा भरू शकले नव्हते, त्यांनी दि. ४ व ५ डिसेंबरदरम्यान आपला विमा भरून प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version