आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
कृषि जगत

BIG BREAKING : माळेगाव साखर कारखान्याचा पहिला हप्ता प्रतिटन २८५१ रुपये; संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

कृषि जगत
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात गळीत झालेल्या उसाला २८५१ रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच सोमेश्वर कारखान्याने २८०० रुपये पहिला हप्ता जाहिर केला होता. त्यानंतर माळेगाव कारखान्याने सोमेश्वरपेक्षा ५१ रुपये अधिक देण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये सोमेश्वरने सर्वप्रथम पहिला हप्ता जाहिर केला. त्यामुळे आता माळेगाव किती दर देणार याकडे सभासदांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली.या बैठकीत सोमेश्वर कारखान्यापेक्षा ५१ रुपये जास्त म्हणजेच २८५१ रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

माळेगाव कारखान्याने राज्यात नेहमीच उच्चांकी दर दिला आहे. त्यामुळे आता चालू हंगामातही माळेगाव ऊस दरात इतर कारखान्यांना मागे टाकेल का याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
कृषि जगत
Back to top button
Contact Us