Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : भिमा पाटस साखर कारखाना उसाला देणार ३ हजार रुपये पहिला हप्ता; आजपासून रक्कम होणार जमा

ह्याचा प्रसार करा

पाटस : प्रतिनिधी

भिमा पाटस कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३००० रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. एम आर एन ग्रुपचे अध्यक्ष मुर्गेश निराणी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी दिली.

भिमा पाटस कारखान्याने ऊसाला पहिला हप्ता ३ हजार रूपये जाहीर  केला आहे. त्यानुसार आजपासून हे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमावेळी आमदार राहुल कुल यांनी इतरांच्या बरोबरीने भीमा पाटस देखील बाजार भाव देईल असे शेतकरी व सभासदांना आश्वासन दिले होते त्यानुसार ३ हजार रुपये भाव जाहीर करून हे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी पूर्ण केले आहे.

सध्या भिमा – पाटसकारखाना पुर्ण क्षमतेने सुरु असून आज अखेर ६०,००० मेट्रिक टनाचे गाळप पुर्ण केले आहे. शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस भिमा पाटस कारखान्यास देवुन सहकार्य करावे असे आवाहनही आमदार राहुल कुल यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version