
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द परिसरात एक बिबट्या आढळून आला आहे. एका शेतात फिरताना हा बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या माळेगाव खुर्द परिसरातच वावरत असल्याचे काही व्हिडिओही सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.
माळेगाव खुर्द परिसरात मागील दोन दिवसात एक बिबट्या आढळून आला आहे. शेतात फिरताना हा बिबट्या दिसून आला असून त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. हा बिबट्या याच परिसरात वावरत असल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट्या शेतात आढळून आल्यामुळे शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली असून शेतात जायचं कसं हा प्रश्न पडला आहे.
माळेगाव खुर्द व परिसरात हा बिबट्या वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, शेतकरी व ग्रामस्थांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच बिबट्याच्या वावराबद्दल जनजागृतीही केली जात आहे.