कोल्हापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपामध्ये जवळीक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपा युती होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मनसे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
राज ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. उद्यापासून त्यांचा कोकण दौरा सुरू होत. त्यानंतर राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजपा आणि मनसे युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, प्रत्येक संघटनेचे अंतर्गत कामे चालू असतात. ही कामे जाहीर करण्याची गरज नसते. कोल्हापूर महानगरपालिका मनसे स्वबळावर लढणार आहे. त्यासोबतच मुंबई महानगरपालिका देखील मनसे स्वबळावर लढणार आहे. सध्या माझा महाराष्ट्र दौरा चालू आहे. निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले.