आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

CRIME BREAKING : तंबाखूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्या आईचा केला खून; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

तंबाखूसाठी पैसे न दिल्याने मुलाने जन्मदात्या आईच्या डोक्यात फावडे मारुन हत्या केल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिरोलीआळी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईचाच तंबाखूपायी खून केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अंजनाबाई बारकू खिल्लारी (वय ६०) असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. तर अमोल खिल्लारी ( वय २३ वर्षे) असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, तंबाखू खाण्यासाठी पैसे द्यावेत यासाठी अमोल खिल्लारी याने मुलाने आईकडे तगादा लावला होता. मात्र त्याच्या आईने तंबाखूसाठी पैसे द्यायला नकार दिला. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. या वादातच अमोलने आपल्या आईच्या डोक्यात फावड्याने घाव घातला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली, मात्र घरात कोणीच मदतीला नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अमोल याला अनेक दिवसांपासून तंबाखू खाण्याचं व्यसन होते. त्यातच कामधंदा नसल्यामुळे तो घरातच पैशांची मागणी करायचा. त्यातून सातत्याने तो आईशी वाद घालत होता. पैसे दे नाहीतर घर सोडून निघून जा अशी धमकीही त्याने आईला दिलेली होती. या प्रकरणी अमोलचे वडील बारकू खिल्लारी यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोलला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us