मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरत वक्तव्य केले. आपले सत्तारांच्या त्या वक्तव्याचा राज्यभरात पडसाद उमटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत अब्दुल सत्तार यांना झापलं. एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर पडसाद उमटले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना थेट फोन लावून त्यांची कानउघडणी केली आहे. तसेच तात्काळ सुप्रिया सुळे यांची माफी मागणीच्या आदेश दिले आहेत. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी प्रवक्त्यांची बैठक बोलावत महत्त्वांच्या नेत्यांशिवाय कोणीही माध्यमांशी संवाद साधणार नसल्याचा वटहुकूम काढला असल्याची माहिती समोर येत आहे.
अब्दुल सत्तार यांनी आज सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल प्रतिक्रिया देताना अपशब्द वापरले. सत्तारांच्या या प्रतिक्रियेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यभर विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेतेही मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. राज्यभरातून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.