आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

BIG NEWS : अजितदादांच्या आर्थिक शिस्तीचं कॅगकडून कौतुक; राजकोषीय तूट कमी करण्यात यश..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी केलेल्या कामाचे आणि त्यांच्या आर्थिक शिस्तीचे ‘कॅग’कडून कौतुक करण्यात आले आहे. आर्थिक संकट असतानाही अजित पवार यांनी शिस्तबद्धपणे अर्थखात्याचे कामकाज करत राज्याची राजकोषीय तूट कमी करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, अजितदादांच्या कॅगकडून झालेल्या कौतुकानंतर त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

विधानसभेत गुरुवारी ‘कॅग’चा अहवाल मांडण्यात आला. या अहवालानुसार राज्यावरचं कर्ज २०१६ – १७ मध्ये चार लाख कोटी एवढं होतं. ते आता पाच लाख ४८ हजार १७६ कोटी झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी करोना काळात दाखवलेल्या आर्थिक शिस्तीचे या अहवालात कौतुक करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याला २०२०-२०२१  मध्ये राजकोषीय तूट तीन टक्क्यांखाली म्हणजे २.६९ टक्क्यांपर्यंत आणण्यात यश मिळाल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कॅगने सादर केलेल्या अहवालानंतर अजित पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी खास ट्विट करत त्यांचं अभिनंदन केले आहे. ‘कोरोना, लॉकडाऊन, मंदी अशा बिकट परिस्थितीत देखील अजितदादांनी राज्याचं अर्थखाते यशस्वीपणे सांभाळलं. यात अजितदादांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली. प्रशासनावरील पकड, उत्तम नियोजन आणि अभ्यास यांच्या जोरावर अजितदादांनी राज्याची आर्थिक बाजू यशस्वीपणे सांभाळली. याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो.’ असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1562775161631555585?s=20&t=RrWoHa0I9CNwVuO4MuyI_g

दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनीही अजितदादांच्या कामाबद्दल ट्विट करत अभिनंदन केले आहे. टिका करणं खूप सोपं असतं मात्र काम करणं खूप आव्हानात्मक असतं. कोरोनाच्या काळात आर्थिक स्त्रोत आटलेले असतानाही अजितदादांनी विरोधकांच्या टिकेकडं दुर्लक्ष करत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राज्याच्या हिताचा कारभार चालवून प्रत्येक घटकाला न्याय मिळवून दिला. अजितदादांच्या याच शिस्तप्रिय आर्थिक व्यवस्थापनाचं कौतुक करून दादांच्या कार्यकर्तृत्वाला कॅगने पोच पावती दिली. याबद्दल आदरणीय अजितदादांचं मन:पूर्वक अभिनंदन! असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1562767934723805185?s=20&t=RrWoHa0I9CNwVuO4MuyI_g


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us