पुणे : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रमाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम नंतर कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२२ साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देण्यात आला होता. मात्र यावर आक्षेप घेत न्यायालयात दाद मागण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिकेमध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज १२ जुलै रोजी सुनावणी झाली असून पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर होणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडत कार्यक्रमास तूर्त स्थगिती देण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगातर्फे कळविण्यात आले आहे.