नीरा : प्रतिनिधी
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील पुरंदर तालुक्यातील नीरानजीक पिंपरेेेेेखुर्द येथे एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. ही घटना गुरूवारी (दि.९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये वाल्हे नजिक सुकलवाडी येथील विजय काळे व माळवाडी येथील नाना भुजबळ यांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड ते गाणगापूर ही बस (एमएच १४ बी टी ३४६६) गाणगापूरकडे निघाली होती. तर विजय काळे व नाना भुजबळ हे दोघेजण दुचाकीवरुन सुकलवाडीकडे निघाले होते. पिंपरे खुर्द येथील जया हॉटेलसमोर आले असता एसटी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.
घटनेनंतर नीरा पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत अपघात स्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे वाल्हे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.