आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पुढील मुक्काम ऑर्थर रोड कारागृहात..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

सातारा : प्रतिनिधी

छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांचा मुक्काम पुन्हा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहे. सातारा पोलिस त्यांना पुन्हा आर्थर रोड कारागृहात सोडणार आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी चार दिवसांपूर्वी मुंबईतून अटक केली. त्यानंतर त्यांना चार दिवस पोलिस कोठडी मिळाली होती. आज पोलिस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून पुन्हा पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र बचाव पक्षाने युक्तीवाद करत पोलिस कोठडीवर आक्षेप घेतला.

सातारा न्यायालयाने सदावर्ते यांना पोलिस कोठडी देण्यास नकार देत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार आता सदावर्ते यांना पुन्हा ऑर्थर रोड कारागृहात सोडण्यात येणार असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आता सदावर्ते यांचा पुढील मुक्काम ऑर्थर रोड कारागृहात असणार आहे.

दरम्यान, सदावर्ते यांच्यावर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून प्रक्रियाही राबवली जात आहे. त्यानुसार आता सदावर्ते यांचा ताबा कोणत्या जिल्ह्यात असेल याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us