
पुणे : प्रतिनिधी
हापूस आंबा प्रेमींना यावर्षी हापूसची चव चाखण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण यावर्षी कोकणमधील आंब्यांचे बदलत्या निसर्गामुळे खुप नुकसान झाले आहे. त्यामुळे हापूसचा हंगाम उशिरा सुरू होत आहे.
सध्या बाजारात घाऊक आणि किरकोळ आवक उपलब्ध असून आंब्याचे भाव चढेच आहेत. येत्या काही काळात बाजारातील हापूस आंब्याची आवक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. १५ एप्रिलनंतर बाजारात आंब्याची आवक वाढू शकते.
कमी आवक असल्याने हे दर वाढले आहेत. आवक वाढल्यास दर कमी होऊ शकतात. बदलत असलेल्या हवामानामुळे सुरुवातीच्या काळात मोहर गळाला असून त्यानंतर आलेली फळेही गळाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ 25 ते 30 टक्के फळे झाडांना आहेत. त्यामुळे हापूस आंब्याची आवक बाजारात कमी आहे.