मुंबई : प्रतिनिधी
काल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनातील भाषणादरम्यान त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. जसा रावणाचा जीव बेंबीत होता, तसा काहींचा जीव मुंबईत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
आज मुंबई मॉडेल जगभरात प्रसिद्ध झाले असून सर्वांनी त्याचं कौतुक केलं. लोक कोरोनामधून बरे होतात पण देशाची द्वेषाची कावीळ जर झाली तर त्याचा उपचार कोणत्या दवाखान्यात करता येत नाही. द्वेषाची ती कावीळ बरीच होऊ शकत नाही, त्याला आपण काय करणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
कोरोना काळात मुंबई महापालिकेने चांगले काम केले. धारावीला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवले. त्याचं सर्वांनी कौतुक केलं. केंद्राचं पथक धारावीत यायचं ते घाबरायचं आणि म्हणायचे कि काहीही करा पण धारावी वाचवा. त्यासाठी पालिकेची यंत्रणा धारावीत उतरले.धारावीला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवले. त्याचे कौतुक करू नका पण घरच्या म्हातारीचा काळही होऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला.