आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

भाजपमध्ये गेल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होणारे नेते पवित्र होतात का? नाना पटोले यांचा सवाल

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

सध्या महाविकास आघाडी नेते आणि मंत्र्यांवर होणाऱ्या ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या दररोज महाविकास आघाडीवर आरोप करत असतात. त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या आरोप करून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आता ते भाजपमध्ये गेले आहेत, मग ते  पवित्र झाले का ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

देशात जनतेचे अनेक महत्वाचे प्रश्न असून या प्रश्नांवर बोलायचे सोडून भाजप आरोप करत आहेत. दरम्यान त्यांचा हा खेळ लोकांच्या लक्षात आला आहे. महाविकास आघाडी नेत्यांवर गंभीर आरोप करून ते महाराष्ट्राची भ्रष्टाचारी राज्य म्हणून प्रतिमा करणायचा प्रयत्न करत असल्याचे पटोले म्हणाले.

 


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us