आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

शिवजयंतीवरून शर्मिला ठाकरे यांचा शिवसेनेवर घणाघात

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सत्तेत गेल्यापासून शिवसेनेला तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीचा विसर पडला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राज्यात आज ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना शपथ दिली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवजयंतीवरून शिवसेनेवर टीका केली. सत्तेत गेल्यापासून सेनेला तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीचा विसर पडल्याची टीका त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिवस रोज साजरा केला तरी तो कमी पडेल, असे राज ठाकरे सांगतात. त्यांचे विचार आणि आचार रोज लोकांना सांगितले पाहिजे. त्यामुळेच आज त्यांनी सर्व मनसैनिकांना शपथ दिली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात आम्हाला शिवजयंती साजरा करता आली नाही. त्यामुळे आम्ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्याचे त्या म्हणाल्या.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us