मुंबई : प्रतिनिधी
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना न्यालयाकडून आजही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा ऑर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने २३ मार्चला अटक केली आहे. येत्या २३ एप्रिलला त्यांना अटक होऊन एक महिना पूर्ण होईल. तरी देखील न्यायालयाकडून त्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे.
येत्या ४ एप्रिलपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. नवाब मलिक यांना पाठीचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयाने कोठडीमध्ये बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु घरच्या जेवणाबाबत अद्याप कोणताही निर्णय न्यायालयाने दिला नाही.