आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

इस्लामच देशाचा खरा शत्रू; संभाजी भिडे यांनी पुन्हा केले वादग्रस्त वक्तव्य

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी संभाजी महाराज बलिदानासंदर्भात बोलत असताना इस्लाम धर्म आणि मुस्लिमांबद्दल जीभ घसरली आहे. औरंगजेबने इस्लाम धर्माविषयीच्या पोटतिडकीतून संभाजीमहाराज यांचे बलिदान केले. तो इस्लाम धर्म आपल्या देशाचा खरा शत्रू असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

शिरूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. आज ना संभाजी महाराज आहेत ना औरंगजेब. मग मेलेली मढी उकरून का काढायची? आजचे नवे युग असून जुने विसरून या नवीन जगासोबत चालूयात, असे म्हणणारी नालायक, देशघातकी वृत्ती सुशिक्षित लोकांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे संभाजी भिडे म्हणाले.

पाकिस्तान आणि बांगलादेशातील वस्त्यांमध्ये आजही औरंगजेब मुस्लिमांच्या रूपात आहे. संभाजी महाराजांनी मरण स्वीकारले. परंतु इस्लाम धर्माचा स्वीकार केला नाही. इस्लामच्या पोटतिकडीतुन औरंगजेबने शिवाजी महाराज यांचे बलिदान केले. तो इस्लाम धर्मच देशाचा खरा शत्रू असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us