आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

Big Breaking : पुण्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या गृहप्रकल्पांत २०० कोटींचा घोटाळा, सोसायटी चेअरमन व सचिवासह इतरांवर गुन्हा दाखल

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील वारजे माळवाडी येथे भटक्या  विमुक्त समाजासाठी बांधलेल्या सदनिकांमध्ये तब्बल २०० कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गृहरचना सोसायटीच्या चेअरमन व सचिवासह इतरांवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक अशोक वेताळ यांनी याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीचे चेअरमन अंबादास दत्तात्रय गोटे (वय  ७० वर्षे, रा. जोशीवाडी, जि. पुणे),  गणेश बजरंग माने (वय ४२ वर्षे, रा.जोशीवाडी जि. पुणे) आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार १९९० ते मार्च २०२२ दरम्यान घडला.

शासनाने भटक्या आणि विमुक्त समाजासाठी साडेचार एकर जमीन राखीव दिली होती. रामनगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेचे चेअरमन अंबादास गोटे,  सचिव गणेश माने तसेच इतरांनी रामनगर सोसायटीच्या मुळ सभासदांना शासनाकडून मिळणाऱ्या या जागांवर घरे बांधून देण्यात येतील असे आश्वासन दिली होते. तक्रारदार आणि इतर सभासदांकडून १९९० पासून आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली होती. परंतु त्यांना सदनिका न देता त्यांची परस्पर विक्री करत गैरव्यवहार केला.

गोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोसायटीचे सभासद आणि शासनाची अंदाजे दोनशे कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर त्यांनी न्यायालयाची दिशाभुल केली आहे. गोटे यांच्या नातेवाईकांनीही या कामात त्यांना मदत केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल काळे हे करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us