आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
विदर्भ

रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू; तीन जण गंभीर

विदर्भ
ह्याचा प्रसार करा

वर्धा : प्रतिनिधी

अपघाताचे ठिकाण बनलेल्या वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा परिसरात आणखी एक विचित्र अपघात झाला आहे. रानडुकरांचा कळप समोर आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

या अपघातात एका फॉर्च्युनर कारने रानडुकराला धडक दिल्याने ती पलटी झाली. पाठीमागून येणार्‍या एका कारने या रानडुकरापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असताना  त्या कारने दुचाकीला धडक देऊन पलटी झाली. या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार झाले असुन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोन रानडुकरांचाही मृत्यू झाला आहे.

या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी असून यामध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. या अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी तातडीने धाव घेतली. या अपघातातील जखमी झालेल्यांवर  सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापूर्वीही या भागात अशाप्रकारचा भीषण अपघात झाला होता. या तीन वाहनांच्या भीषण अपघातानंतर  तरी अपघाताचे प्रमाण कमी करण्यास प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
विदर्भ
Back to top button
Contact Us