आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

मित्रच ठरला वैरी; धनकवडीत कपडे व्यावसायिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

धनकवडी येथील स्मशानभूमीच्या परिसरात कपडे व्यावसायिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात सुरज विजय बरवे (वय २८, रा. धनकवडी)  हा तरुण ३५ टक्के भाजला आहे. याबाबत त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गोविंदा उर्फ सत्येंद्र यादव (रा. गुजरवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गोविंदा आणि सुरज हे मित्र आहेत. सुरज राहत्या घरातून कपडे विकण्याचा व्यवसाय करतात. त्याचेच पैसे गोळा करत असताना त्यांना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास गोविंदा भेटला. त्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये जाऊन दारू पिली. धनकवडी येथील स्मशानभूमीत जाऊन ते गप्पा मारत होते. त्यावेळी नशेत गोविंदा यांनी सुरज यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सिमेंटचा ब्लॉक त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

सुरज यांनी वडिलांच्या गाडी भरण्यासाठी आणलेले पेट्रोल गोविंदा यांनी त्यांच्या अंगावरुन ओतले. या घटनेची माहिती सुरज यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी  धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. ते ३५ टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनीही लगेच गोविंदाला अटक केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश लोंढे करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us