मुंबई : प्रतिनिधी
किशोर पेडणेकर यांचा आज महापौरपदाचा शेवटचा दिवस आहे. मुंबई महापालिका निवडणुका न झाल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि महापौरही शिवसेनेचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं ज्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यावरून मुंबईकर निश्चितच शिवसेनेसोबत आहेत. मुंबईकरांच्या आशीर्वादावर आमचा मुंबईत भगवा कायम राहणार आणि मुंबईमध्ये पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
उद्यापासून आमची एक नवीन इनिंग सुरू होत आहे. आमचा कार्यकाळ जरी संपला असला तरी मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार आहे. मुंबईला असेच वाऱ्यावर सोडणार नाही. परिचारिकेची आवड असल्याने मी कोरोना काळात काम करू शकले. उद्धव ठाकरे यांच्यामुळे ही संधी मला मिळाली, त्यामुळे त्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे कमी असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.