
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विरोधी पक्षाकडून महाराष्ट्रातील आरोग्यसेवा व्यवस्थापनावर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र या टीकेला केंद्र सरकारकडूनच उत्तर मिळाले आहे. आरोग्य सेवा देण्यामध्ये आणि आरोग्य सेवा व्यवस्थापन करण्यामध्ये महाराष्ट्र सरकार देशामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. केंद्रीय माहिती आयोगाने या बाबतचा अहवाल दिला आहे.
केंद्रीय निती आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वोत्तम आरोग्य सेवेसाठी केरळ देशामध्ये पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर आंध्रप्रदेश आहे. तर तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य व्यवस्थापनात उत्तर प्रदेशचा शाब्दिक गौरव केला होता. मात्र उत्तर प्रदेश या निर्देशित राज्यांमध्ये सगळ्यात खालच्या स्थानावर आहे.
केंद्रीय माहिती आयोगाने आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्राला ६४.६३ हे गुण दिले आहेत. तर केरळला ७४.६५ आणि आंध्रप्रदेशला ६५.३१ गुण दिले आहेत. खासगी आरोग्य सेवेमध्ये मुंबई, पुणे, नागपूर या जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्व उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु सरकारी सेवांमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्याचा अपेक्षित दर्जा नाही.