मुंबई : प्रतिनिधी
राज्यात भाजप सरकार सत्तेत असताना महाआयटीमध्ये तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.मुंबईतील शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख केला. राऊत यांनी या घोटाळ्याप्रकरणी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे या दोघांची नावे घेतली. या दोघांच्या बँक खात्यातून पैसे कुठे गेले, टेंडर नसताना ते कोणाला दिले गेले, याची तक्रार मी तपास यंत्रणाकडे करणार आहे. माझ्याकडे आत्तापर्यंत याप्रकरणी ५ हजार कोटी रुपयांचा हिशोब आला असल्याचे राऊत यांनी सांगितले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, हरियाणामध्ये एन नरवर नावाचा दूधवाला आहे. तो ७ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. एक सामान्य दूधवाला एवढा संपत्तीचा मालक कसा काय होऊ शकतो..? या नरवरला ईडी ओळखते का..? देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना त्याचे भाजप नेत्यांकडे येणे-जाणे होते. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर त्याची एवढी संपत्ती झाल्याचेही राऊत यांनी सांगितले.