मुंबई : प्रतिनिधी
आजच्या ‘प्रॉमिस डे’चे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे वचन दिले आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत हे प्रॉमिस केले आहे.
आज प्रॉमिस डे! आजच्या या दिवशी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रॉमिस जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर चालणाऱ्या ट्रेंडला ते नेहमीच फॉलो करतात. सोशल मीडियावर सध्या व्हॅलेंटाईन वीकचा जोरदार ट्रेंड चालू आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये आज प्रॉमिस डे आहे. या ‘प्रॉमिस डे’चे औचित्य साधून जयंत पाटील यांनी शरद पवार आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे प्रॉमिस केले आहे.