आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहानगरेमहाराष्ट्र

Big Breaking : येरवड्यात मजुरांवर काळाची झडप; इमारतीचा स्लॅब कोसळून पाच मजुरांचा मृत्यू

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील येरवडा परिसरात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मजुरांवर शासकीय  रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. 

येरवड्यातील शास्त्रीनगर भागात इमारतीचे बांधकाम चालू असताना ही दुर्घटना घडली आहे. तळमजल्यावर मजूर काम करत असताना त्यांच्यावर अचानक स्लॅबची जाळी कोसळली. ढिगाऱ्याखाली आठ मजूर अडकले होते. त्या मजुरांना अग्निशमन दलाच्या पथकाने बाहेर काढले. मात्र पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना कशामुळे घडली अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
नियमांचे पालन न करता बांधकाम चालु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, या दुर्घटनेत मृत पावलेल्या मजुरांची अद्याप ओळख पटलेली नाही. परंतु सगळे मजूर बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us