आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहानगरेमहाराष्ट्रमुंबई

Breaking News : पुण्यात प्रवास करण्यासाठी पीएमपीएमएलने लागु केला नवा नियम

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यात आता पीएमपीएमएल बसने प्रवास करायचा असेल तर प्रवाशांकडे आता लसीकरण प्रमाणपत्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले युनिव्हर्सल पास असणे बंधनकारक केले आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील परिस्थिती पाहता राज्य सरकारने चित्रपटगृहे, मॉल, सरकारी कार्यालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.पीएमपीएमएलने देखील असा नियम  लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पण काही नागरिक पालन करत नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी दोन डोस घेतले आहे किंवा युनिव्हर्सल पास असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us