आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

बारामतीत राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; कर्नाटकातील विटंबनेचा नोंदवला निषेध

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला आहे. यासाठी राज्यभर महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला. तसेच या घटनेबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अमर धुमाळ, राहुल कदम, सोशल मिडीयाचे शहराध्यक्ष तुषार लोखंडे, नगरसेवक समीर चव्हाण, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष साधू बल्लाळ, अतुल बालगुडे, संतोष जगताप, सागर खलाटे, अभिजित ढवाण, चेतन काळे, अभिजित निगडे, तुषार सावंत, सुरज सावंत, कुणाल जाधव, नावेद शेख, निखिल चव्हाण, विशाल जाधव, महेश साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याला उपस्थितांना दूधाने अभिषेक घातला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. 


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us