आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

२०२४ निवडणूक : भाजपची स्वबळावर सत्ता; फडणवीसांच्या दाव्यावर मलिकांचे प्रत्युत्तर..

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेते अनेकदा हे सरकार पडणार असल्याचे सांगत आहेत. असे असताना  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ ला भाजप स्वबळावर निवडून येईल असा दावा केला होता. याला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आता राज्य सरकार पाडणार नाही. हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ अशी भूमिका मांडली आहे. यावरुन सरकार पडणार नाही हे भाजपा नेते स्वीकारत आहेत, असे प्रत्युत्तर मलिक यांनी दिले आहे.

याशिवाय महाविकास आघाडीचे सरकार राज्यात २०२४ ला पुन्हा निवडून येईल. असा विश्वास व्यक्त करत पुढील २५ वर्षासाठी हे महविकास आघाडीतील पक्ष एकत्र आल्याचेही नवाब मलिक यांनी नमूद केले आहे. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला. राज्य सरकार ‘बाते कम आणि काम जादा’ करत आहे. असे सांगत राज्य सरकारचा २ वर्षातील कामकाजाचा आढावा मलिक यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितला.     


ह्याचा प्रसार करा
पुणे

2 टिप्पण्या

  1. Our Transportation from Hobby Airport to Galveston Beach offers a comfortable, reliable ride, including private car service and shuttle options. Whether heading to Galveston Seawall or Moody Gardens, enjoy seamless Galveston Beach transportation with affordable transfer services.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us