भवानीनगर : प्रतिनिधी
छत्रपती सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांची दिवाळी यंदाच्या वर्षी धुमधडाक्यात साजरा होणार आहे. नुकत्याच शुक्रवारी कामगारांना बोनस वाटप करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी ही माहिती दिली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कामगारांना १० टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी कामगारांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. बोनसची दोन टप्प्यांत विभागणी केली असून पहिला टप्पा दिवाळीसाठी देण्यात आला आहे. नंतरचा टप्पा मकरसंक्रांतीच्या वेळी देण्यात येणार असल्याचे प्रशांत काटे यांनी सांगितले.
कामगारांच्या बोनसपोटी तब्बल पावणे दोन कोटी रुपये कामगारांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या १८० कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात आले आहे. तसेच ६२ कामगारांनाही कामावर घेण्यात आले आहे.