आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Big News : राज ठाकरे आणि त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांना कोरोनाची लागण

महानगरे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या मातोश्रींंनाही कोरोनाची बाधा झाली असून सध्या दोघांवरही घरीच उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांना कोरोना लागण झाल्यामुळे मनसेकडून आयोजित केलेले मेळावे आणि कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनाची लाट आल्यानंतर राज ठाकरे यांनी आपण मास्क वापरणार नाही अशी भुमिका घेत आपले सर्व कार्यक्रम विनामास्क पार पाडले होते. मात्र त्यांना आता कोरोनाची बाधा झाली आहे. राज ठाकरे यांना अत्यंत सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु करण्यात आलेत. 

राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांनाही कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावरही घरीच उपचार करण्यात येत आहेत. मध्यंतरीच्या काळात राज ठाकरे यांनी विविध शहरांचे दौरे केले. मात्र त्यांनी मास्क वापरलाच नाही. 

आजही राज ठाकरे यांच्या उपस्थितीत भांडूप येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह ठाण्यातही मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सद्यस्थिती सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us