आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमनोरंजनमहानगरेमहाराष्ट्र

फटाका विक्रीच्या परवान्यासाठी ३ नोव्हेंबरपूर्वी अर्ज करा : प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

दिवाळी उत्‍सव सन २०२१ करीता बारामती उपविभागात शोभेची दारू व फटाके विक्रीचे परवाने उपविभागीय दंडाधिकारी, बारामती यांच्या कार्यालयाकडून देण्‍यात येणार आहेत. बारामती उपविभागामध्‍ये फटाका विक्रीचे परवाने हवे आहेत त्‍यांनी अर्ज साध्‍या कागदावर ३ नोव्हेंबर २०२१ पुर्वी करावेत.  ३ नोव्हेंबर नंतर केलेल्‍या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

सदर अर्ज करताना अर्जास १० रूपयाचे कोर्ट फी स्‍टॅम्‍प लावणे आवश्‍यक आहे.  ज्‍या जागेत व्‍यवसाय करावयाचा आहे. त्‍या जागेचा मिळकत रजिस्टरचा उतारा अथवा सदर जागा दुसऱ्याची असल्‍यास त्‍या जागेचा वापर करण्‍यास सं‍बंधिताचे स्‍टॅम्‍प पेपरवर संमतीपत्र तसेच जागा सुरक्षिततेबाबत अर्जदार यांचे १०० रूपयाच्‍या स्‍टॅम्‍पवर प्रतिज्ञापत्र सांक्षाकित करून सादर करावे. 

पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक यांचा शोभेची दारू व फटाके साठा व विक्री करण्याच्या सुरक्षिततेबाबत आणि दंड व शिक्षा झाली आहे. किंवा कसे याबाबतचे प्रमाणपत्र तसेच नाहरकत प्रमाणपत्र व व्‍यवसायाची जागा सुरक्षित असल्‍याबाबतचे प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील स्‍टॉलबाबत नगरपालिकेचे दुकानासाठी जागा दिल्‍याच्‍या पत्राची प्रत, मागील वर्षाच्या परवान्‍याची झेरॉक्‍स प्रत, अर्जासोबत परवाना फी रूपये ६०९ योग्य लेखा शिर्षाखाली शासकीय कोषागारात जमा करून त्‍याचे मूळ चलन अर्जासोबत जोडावे. 

शोभेची दारू व फटाके विक्रीची मुदत ही (दि:१६) नोव्हेंबर २०२१ पर्यंत अंमलात राहील. परवान्‍याची मुदत संपल्‍यानंतर परवाना धारकांनी शिल्लक राहीलेला माल जवळ ठेवू नये. शिल्‍लक राहीलेला माल कायम स्‍वरूपाचा परवाना असलेल्‍या परवाना धारकांजवळ ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच कोविड- १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे परवाने देण्याबाबतच्या निर्णयाची माहिती उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून देण्यात येईल असे उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कळविले आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us