आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
कृषि जगतमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

शेतकऱ्यांना चिरडण्याचा जालियनवालाबाग हत्याकांडासारखा प्रकार : शरद पवार

कृषि जगत
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

उत्तरप्रदेशातील लखिमपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या हिंसाचारात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार उत्तरप्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. लखीमपुर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. 

शेतकरी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारवर कडाडून टिका केली. एक वर्षापासून शेतकरी शांतपणे आंदोलन करत आहेत. लोकशाहीमध्ये शांतपणे आंदोलन करण्याचा हक्क आहे. तो हक्क वापरत लखिमपुरमध्ये शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारची भागीदारी असलेल्या परिवारातील काही लोकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात गाडी घालून त्यांना चिरडले. त्यात काही  शेतकऱ्यांची मृत्यू झाला. या घटनेची  सगळी जबाबदारी केंद्रातील भाजप सरकारची आणि उत्तर प्रदेश सरकारची आहे असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. 

शांतीपूर्वक आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर हल्ला करणाऱ्या केंद्र सरकारची नीतिमत्ता दिसून येत असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून सत्तेचा वापर शेतकऱ्यांना दाबण्यासाठी होणारा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही विरोधक शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. त्यांच्या मागणीसाठी आम्ही लढा देवू असेही त्यांनी सांगितले. 

ज्याप्रकारे उत्तर प्रदेश सरकार वागणूक देत आहे. ती वागणूक लोकशाहीची हत्याच आहे. हे सरकारच मुळात असंवेदनशील आहे. सरकारच्या या वागणुकीला सामान्य शेतकरीच उत्तर देतील, असेही शरद पवार यांनी नमूद केले. 


ह्याचा प्रसार करा
कृषि जगत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us