मुंबई : प्रतिनिधी
महिला पोलिस कर्मचार्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकार्यांच्या कामाचे तास घटवण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे सर्व महिला पोलिसांना १२ तास कामासाठी उपस्थित राहावे लागते. परंतू, आता १२ तासांवरून कामाचे ८ तास करण्यात येणार आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी ही माहिती दिली आहे.
पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या महिलांना दिवसाचे १२ तास ड्यूटी उपस्थित रहावे लागते. अनेक महिला पोलिस कामा बरोबरीनेच संसारही सांभाळाव लागतो. कित्येक महिला घरातील सर्व कामे करुन आपली दुटी करतात. तसेच अनेकवेळा महिलांना सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून कामाचा वेळ सोडूनही अधिक वेळेत काम करावे लागते. त्यामुळे कुटुंबीयांनी वेळ देता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेकदा कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाद निर्माण होतो.
महिलांचा विचार करता आघाडी सरकार हा निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे अनेक महिला पोलिस स्वत: सोबत कुटूंबाची काळजी घेऊ शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांचे आयुष्य सुरळीत होईल.
हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.