सातारा : प्रतिनिधी
कोरोनाचे जगावर मोठे संकट आहे. हे संकट असतानासुद्धा रयत शिक्षण संस्थेने उत्तम कामगिरी केली आहे. या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता; संस्थेने उत्तम कामगिरी उत्तम कामगिरी केली आहे. यासाठी त्यांनी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अध्यापन करत; अध्यापनासाठी संस्थेतील सर्वच शिक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मोठ्या संकट काळात कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही ही बाब संस्थेच्या गेल्या शंभर वर्षाची इतिहासातील नावलौकीक करणारी आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीच्या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख प्रमुख मार्गदर्शक म्हणून पवार बोलत होते. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पवार यांनी सर्व अधिकारी व शिक्षक यांचे कौतुक केले.
यावेळी शरद पवार म्हणाले की , कोरोनासारख्या संकटामुळे सर्व जगात नकारात्मकता पसरली आहे. असे असताना सुद्धा संस्थेने उत्तम कामगिरी करत; सर्व ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवले. संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी रोझ प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण पोहोचवले. हा शिक्षण क्षेत्रातील नवा आदर्श आहे.
विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण टाळण्यासाठी संस्थेने सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. संस्थेत शिकणाऱ्या एकूण ७० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचले आहे. डोंगरदऱ्यातील व इंटरनेट अभावी शिक्षणापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांची खंत आहे. परंतु त्यांच्या पर्यंत शिक्षण पोहोचवण्याची जबाबदारी संस्था खात्रीने पार पडेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.