आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतपुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

बारामतीत उद्यापासून प्रत्येक गुरुवारी राष्ट्रवादीच्या वतीने ‘जनता दरबार’

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

सर्वसामान्य नागरिकांचे  विविध प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक गुरुवारी बारामतीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवार दि. १ जुलैपासून सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रवादी भवनामध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती बारामती तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.

बारामती तालुका आणि परिसरातील नागरिकांच्या समस्यांवर तातडीने निर्णय व्हावा, या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार या उपक्रमाचे आयोजन आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी केले जाणार आहे. त्यामध्ये विविध खात्यांशी संबंधित कामे, विकासकामे यासह विविध प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे. बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी भवनात प्रत्येक गुरुवारी हा उपक्रम राबवला जाणार आहे.

या उपक्रमात पंचायत समिती, जिल्हा परिषद,मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी विक्री संघ, सचिव संस्था,  सोमेश्वर,माळेगाव,भवानीनगर कारखाना, संजय गांधी, विद्युत वितरण व पुरवठा कमिटीसह पक्ष प्रतिनिधी व सर्व संस्थांचे प्रमुख मान्यवर आपल्या तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी शासन दरबारी सोडविण्यासाठी तसेच विकासकामे,सहकारी संस्था व कामकाज अडचणी व मदतीसाठी सहभागी होणार आहेत.  या उपक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us