आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतमहानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत जास्तीत जास्त कर्जवाटप करून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

  • अनिष्ट तफावतीमधील सहकारी संस्थांना तफावतीच्या बाहेर काढा : ना. पवार 
  • एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हा बॅंकेच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
  • उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील पीककर्ज वाटप आणि एनडीसीसी मधील इतर मुद्द्यासंदर्भात पार पडली बैठक

मुंबई : प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटप आणि इतर मुद्द्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यभरात चांगला नावलौकिक असलेली बँक होती. बँकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आलेली आहे.महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेपोटी जिल्हा बँकेला ९२० कोटी रुपये मिळाले. त्यातील फक्त २३१.५१ कोटी पिक कर्ज वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे . त्यामुळे शेतऱ्यांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जे शासनाने आखुन दिलेले आहे त्याप्रमाणे त्यांनी ते पुर्ण करावे आणि इतर कर्जपुरवठा हा राष्ट्रीकृत बॅंकांच्या मदतीने करण्यात यावा या माध्यमातून शेतकऱ्यांना मात्र कर्ज पुरवठा झालाच पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

अनिष्ट तफावतीमध्ये असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिले जात नाही.या संस्थांना तफावतीमधून बाहेर काढावे,कारण नाशिक जिल्ह्यात ४५३ विविध सहकारी संस्था अनिष्ट तफावतीमध्ये आहेत.ग्रामीण भागातील सहकार चळवळ टिकवण्यासाठी या संस्था जिवंत राहायला हव्या असे मत  मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. संबंधित संस्थांचे शेतकरी हे पिक कर्जा पासून वंचित राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच या संस्थांना अनिष्ट तफावतीमधुन बाहेर काढावे यासाठी त्या संस्थांमधील कर्जवसुलीला गती देण्यात यावी. असे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार , नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक श्री. देशमुख, नाशिक बँकेचे प्रशासक श्री अन्सारी ,सहकारी संस्था सहनिबंधक ज्योती लाटकर,डीडीआर सतीश खरे हे उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us
%d