आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मनोरंजनमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात; जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्द

मनोरंजन
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने नवनीत राणा यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे नवनीत राणांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

नवनीत राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत महत्वाचे स्थान असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल न्यायालयाने दिला असून त्यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.  खोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे नवनीत राणा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होवू शकते. त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवनीत राणा काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.            


ह्याचा प्रसार करा
मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us