पुणे : प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘सी.आय.आय.’च्यावतीने उपलब्ध करण्यात आलेल्या १५० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशिनचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, ‘सी.आय.आय.’चे अध्यक्ष दीपक गर्ग यांच्यासह कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कॉन्स्ट्रेटर मशीनचे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शासकीय रुग्णालयांना वितरण करण्यात येणार आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवडला ६० आणि ससून रुग्णालयाला ९० मशीन वितरीत करण्यात येणार आहेत.
हे मशीन हाताळण्यास सोपे असून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी सहज घेऊन जाता येतात. ऑक्सिजन सिलेंडरच्या तुटवड्याच्या काळात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन उत्तम पर्याय ठरणार आहे.