आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पिंपरी-चिंचवडपुणेबारामतीमहाराष्ट्र

हो रे बाबा.. मी लस घेतली; पण फोटो नाही काढला : अजितदादांचं त्या प्रश्नावर खुमासदार उत्तर

पिंपरी-चिंचवड
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी तुम्ही कोरोनाची लस घेतली का अशी विचारणा केली.त्यावर अरे बाबा, मी लस घेतली फक्त इतरांसारखी फोटो काढण्याची नौटंकी केली नाही असं उत्तर अजितदादांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

भारतात कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर अनेक नेत्यांनी लस घेत त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केले. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात पत्रकारांनी अजितदादांना लस घेतली का याबद्दल विचारणा केली होती. त्यावर आरोग्य, पोलीस अशा महत्वाच्या विभागात काम करणाऱ्या लोकांसाठी लसीकरण सुरु असून मी लस घेतली की तुम्हाला कळवेन असं उत्तर अजितदादांनी संबंधित पत्रकाराला उद्देशून दिले होते.

आज पुण्यात कोरोनासंदर्भात बैठक झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत लॉकडाऊनबाबत भूमिका मांडली. यावेळी तुम्ही कोरोनाची लस घेतली का अशी विचारणा पत्रकारांनी केली. त्यावर मी लस घेतली पण फोटो काढण्याची नौटंकी नाही केली असं उत्तर दिलं.. त्यावर एकच हशा पिकला.


ह्याचा प्रसार करा
पिंपरी-चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us