आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणपश्चिम महाराष्ट्रबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

बारामतीत भर बाजारपेठेतील दुकानातून चोरी; दोन महिलांना अटक

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील एका ऑटोमोबाईल दुकानाचे शटर उचकटून ४० हजारांचा ऐवज चोरणाऱ्या, तसेच इतर दोन दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ही चोरी उघड झाली आहे.
आरती शंकर पाथरकर (वय २६) आणि ताई शंकर पाथरकर (वय २०) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिलांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, बारामती शहरातील सिनेमा रोडवरील गांधी ऑटोमोबाइल हे दुकान फोडून दुकानातील रोख १० हजार रुपये, २५ हजार रुपये किमतीचे पितळी गन मेटल बुशिंग आणि ५ हजार रुपये किमतीचे लोखंडी बेरींग असा ४० हजारांचा ऐवज पहाटेच्या वेळी चोरीला गेला होता. याबाबत समीर शांतीकुमार गांधी (रा. विजयनगर कॉलनी) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याच दिवशी बुरहानी मशनरी आणि महाराष्ट्र मशनरी या दोन दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाला होता.
या चोरीच्या घटनेनंतर व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत होता. व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत या चोरीचा तपास करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याला या प्रकरणाचा छडा लावण्याच्या सूचना केल्या होत्या.
गुन्हा उघड करण्यासाठी शहर पोलिसांनी येथील सीसीटीव्ही चित्रकरणाची पाहणी केली. त्यामध्ये दोन महिला चोरी करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या महिलांची ओळख पटवली असता आरती पाथरकर आणि ताई पाथरकर या दोघींनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघींना अटक करून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, सागर घोडके, कर्मचारी रामचंद्र शिंदे, दशरथ कोळेकर, दशरथ इंगोले, गौरव ठोंबरे, सचिन कोकणे आणि पोलिस कॉन्स्टेबल गवळी यांनी या चोरीचा छडा लावला.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us